महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पायाला दुखापत होऊनही पूजासाठी काम हाच खरा 'साजणा'! - shooting

या मालिकेत पूजा एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेऊ न शकलेली, तरीही स्वाभिमानी, अशा तरुणीची भूमिका साकारत आहे. तिची स्वप्ने मोठी आहेत. ही 'रमा' प्रेक्षकांच्या आवडीची ठरू लागली आहे.

पायाला दुखापत होऊनही, पूजासाठी काम हाच खरा 'साजणा'!

By

Published : May 3, 2019, 5:45 PM IST

मुंबई - 'झी युवा' वर 'साजणा' ही मालिका नव्याने सुरू झाली आहे. हळूहळू ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली आहे. या मालिकेतील 'रमा' ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी हीदेखील या मालिकेद्वारे घराघरात पोहोचली आहे. पूजाची ही पहिलीच मालिका आहे. मात्र, मालिकेचा एक भाग चित्रीत करत असताना पूजाच्या पायाला दुखापत झाली. तरीही शूटिंगमध्ये खंड पडू न देता तिने शूटिंग सुरू ठेवले.

या मालिकेत पूजा एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेऊ न शकलेली, तरीही स्वाभिमानी, अशा तरुणीची भूमिका साकारत आहे. तिची स्वप्ने मोठी आहेत. ही 'रमा' प्रेक्षकांच्या आवडीची ठरू लागली आहे.

पूजा बिरारी

'चिंगी' आणि 'रमा' या बहिणी नाशिकला मामाच्या गावी गेलेल्या असतात. त्यावेळी जत्रेत घडणाऱ्या एका अपघाताचा प्रसंग चित्रित करत असताना ही घटना घडली. जत्रेत उधळलेला घोडा चिंगीच्या अंगावर धावून जातो आणि प्रताप चिंगीला त्या घोड्यापासून वाचवतो, असा तो प्रसंग होता. मात्र, या चित्रीकरणाच्यावेळी घोडा खरंच उधळला आणि सेटवर खरोखरच एक अपघात घडला.

पूजा बिरारी
यावेळी पुजाच्या पायाला दुखापत झाली. तिला लगेचच रुग्णालयात न्यावे लागले. पायाला प्लास्टरसुद्धा घातले गेले. अशा परिस्थितीतसुद्धा आराम करण्याऐवजी पुढील चित्रीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय पूजाने घेतला. दुखापतग्रस्त असतानाही पूजाने कामाला अधिक महत्त्व दिलेले पाहून, सेटवर सगळेच जण भारावून गेले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details