मुंबई -अभिनेत्री पुजा बेदीची मुलगी अलाया फर्नीचरवाला ही सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. अलायाचे नाव यापूर्वी आलिया असे होते. मात्र, तिने हे नाव बदलून आता अलाया केले आहे. सोशल मीडियावरही तिच्या नावात बदल झालेला पाहायला मिळतो.
अलायाने नाव बदलण्याच्या मागचं कारण सांगितलं आहे. चित्रपटसृष्टीत आधीच आलिया भट्टचे नाव सुप्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिने स्थान मिळवले आहे. त्यामुळे याच नावाने सुरुवात करण्यापेक्षा नाव बदलून करिअरची सुरुवात करण्यासाठी नावात बदल केला असल्याचं तिने म्हटले आहे.
हेही वाचा -अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटातून किर्ती सुरेशची माघार, आता 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका