पुण्यात पत्रकार संघ कलाकार कट्टा या कार्यक्रमात अभिनेत्री श्रुती मराठे सोबत वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिने विविध विषयांवर मते मांडली.
सिनेजगतातही राजकारण आहेच - अभिनेत्री श्रुती मराठे - सिनेजगतातही राजकारण आहेच
राजकारण हे कलाक्षेत्रात ही आहे. फक्त मराठी इंडस्ट्रीमध्येच नाही तर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये राजकारण आहे असे मत अभिनेत्री श्रुती मराठे यांनी व्यक्त केले...
फिल्म इंडस्ट्रीमध्ये ग्रुपीझम चालूच असते. त्यातून आपण बाहेर कस पडावं किंवा त्यात व्यवस्थित कस शिराव हे आपण ठरवाव. मात्र मी कुठल्याही ग्रुपचा पार्ट नाही. मराठी चित्रपट सृष्टीत महेश मांजरेकर, रवी जाधव, अमेय याचे ग्रुप आहेत. यांच्या कुठल्याच ग्रुपमध्ये मी नाही.. मला याचा अगोदर त्रास व्हायचा पण आता कुठल्या ग्रुपचा भाग नाही त्यामुळे बर वाटतेय.
आपल्याकडे अजूनही बोलण्याच स्वातंत्र्य नाही. आपण एखादे मत मांडलं तर त्याला विरोध करणारे असतात, प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतातय. पण एखाद्याने मत मांडले तर त्याला प्रतिउत्तर येत. कलाकाराची तर अक्कलच काढली जाते. यामुळे राजकारणाबद्दल माझं मत न देण्याच कारण म्हणजे ते मत स्वीकारलं जात नाही, असे श्रुती यावेळी म्हणाली....