मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' या बायोपिकला प्रदर्शनापूर्वीच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलिकडेच चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जावेद अख्तर आणि समीर यांना गीतांचे क्रेडित देण्यात आल्यामुळे जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला होता. आपण या चित्रपटासाठी कोणतेही गाणे लिहिले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी याबद्दल एक खुलासा केला आहे.
'या' कारणामुळे जावेद अख्तरांना 'पीएम मोदी' चित्रपटासाठी क्रेडिट दिले, निर्मात्यांचा खुलासा - विवेक ओबेरॉय
अलिकडेच चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जावेद अख्तर आणि समीर यांना गीतांचे क्रेडित देण्यात आल्यामुळे जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला होता.
संदीप सिंग यांनी ट्विटरवरुन जावेद अख्तर आणि समीर यांना चित्रपटाच्या गाण्यासाठी क्रेडिट का दिले याचा खुलासा केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलेय, की आम्ही 'पीएम मोदी' बायोपिकमध्ये '१९४७-अर्थ' या चित्रपटातील 'ईश्वर अल्हा' आणि 'दस' चित्रपटातील 'सुनो गौर से दुनियावालो' हे गाणे घेतले आहे. या गाण्यांचे बोल जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिले आहेत. त्यामुळे या पोस्टरमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
विवेक ओबेरॉय हा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. 'पीएम मोदी' हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.