पुणे - शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे फिल्म फाऊंडेशनने आगामी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पीफ्फ) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी १९ व्या आवृत्तीत या महोत्सवाचे उद्घाटन ११ मार्च रोजी होणार होते. उत्सवाच्या नवीन तारखा योग्य वेळी जाहीर केल्या जातील, अशी माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
थिएटरमध्ये पीफ्फचा आनंद घेण्याविषयी काहींना शंका
“सध्याच्या परिस्थितीमुळे चित्रपट प्रेमींना थिएटरमध्ये पीफ्फचा आनंद घेण्याविषयी काही शंका आहेत. थिएटरमध्ये पीफसाठी त्यांची नोंदणी ऑनलाइन स्वरुपात रूपांतरित केली जाऊ शकते का हे तपासण्यासाठी बर्याच प्रतिनिधींनी चौकशी केली. आयोजक म्हणून आम्ही नेहमीच हा उत्सव जास्तीत जास्त चित्रपटरसिकांना आनंद घ्यावा अशी अपेक्षा करतो आणि म्हणून हा चित्रपट महोत्सव थियेटरमध्ये आयोजित केला जातो.पण यंदा पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण हे आत्ता वाढत असल्याने चित्रपटगृहात महोत्सव न होता ऑनलाईन स्वरूपात यंदाचं पिफ होणार असल्याचं जब्बार पटेल यांनी सांगितलं