महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'फोटो प्रेम' चित्रपट अ‌ॅमेझॉन प्राईमवर - 'फोटो प्रेम' चित्रपट अ‌ॅमेझॉन प्राईमवर

अमेझॉन प्राइम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे 'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात ७ मे रोजी करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीना कुलकर्णी, अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

फोटो प्रेम चित्रपट
फोटो प्रेम चित्रपट

By

Published : May 3, 2021, 6:55 PM IST

मुंबई - अमेझॉन प्राइम व्हिडियो आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्यातर्फे 'फोटो प्रेम' या आगामी डायरेक्ट टू स्ट्रीम मराठी चित्रपटाचा प्रीमिअर भारतात ७ मे रोजी करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीना कुलकर्णी,अमिता खोपकर आणि समीर धर्माधिकारी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'फोटो प्रेम' ही ‘माई’ या व्यक्तिरेखेची कथा आहे. आपल्या ‘जुन्या फोटो’मध्ये आपण तितकेसे छान दिसत नसल्यामुळे आपल्या मृत्यूनंतर सर्वांना आपला विसर पडेल याची माईला चिंता असते. माईचा कॅमेऱ्याची भीती घालविण्याचा आणि शेवटी या भीतीवर मात करून परफेक्ट फोटो काढण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटाची निर्मिती आदित्य राठी, मेहुल शहा आणि गायत्री पाटील यांची आहे. आदित्य राठी व गायत्री पाटील या दोघांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शित केला आहे.

या ट्रेलरमध्ये माईच्या आयुष्याची झलक दिसते. माई एका मृत व्यक्तीचा लहानपणीचा फोटो पाहून चिंतीत होताना दिसते. तिचे अलीकडील फारसे फोटो उपलब्ध नसल्याने तिच्या मृत्यूनंतर लोक तिला कसे लक्षात ठेवतील, याचा ती विचार करू लागते. त्यानंतर एक परफेक्ट फोटो काढण्यासाठी माईचा उत्कंठावर्धक प्रवास सुरू होतो.

फोटो प्रेम एक असामान्य कथा...

दिग्दर्शक आणि सहलेखक आदित्य राठी म्हणाले, “'फोटो प्रेम' ही एका सामान्य प्रसंगाची असामान्य कथा आहे. प्रत्येकाला ही कथा त्यांच्या जवळची वाटते. प्रत्येक माणसामध्ये आढळणारी भावनिक बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आपल्या मृत्यूनंतर जग आपल्याला कसे लक्षात ठेवेल याचा ते विचार करू लागतात, हा धागा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे. अमेझॉनमुळे मराठी प्रेक्षकांबरोबरच भारतातील प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचू शकेल. अलीकडेच आमचा ‘पिकासो’ हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आम्ही 'फोटो प्रेम' हा आमचा चित्रपट प्रदर्शित करत आहोत.

दिग्गज कलाकार आणि मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना कुलकर्णी म्हणाल्या, “'फोटो प्रेम' ही अत्यंत बारकावे टिपणारी आणि विचार करायला लावणारी कथा आहे आणि या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका निभावता येणे हे कोणत्याही बहुमानापेक्षा कमी नाही. या चित्रपटात एक निरागस आणि विशुद्ध भावना दर्शविण्यात आली आहे आणि या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे. 'फोटो प्रेम' या चित्रपटातील माईची गोष्ट शक्य तितक्या विस्तृत पातळीवर दाखविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details