महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'लव्ह आज कल २' चं नवं गाणं, पाहा सारा-कार्तिकचा धमाल डान्स - kartik aryan in Love Aaj kal

या गाण्याला अरिजीत सिंग आणि शास्वत यांनी गायले आहे. तर, प्रितम यांनी संगीत दिले आहे. इरशाद कामिलने या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

Haan Main Galat song, Peppy Dance Number from Love Aaj kal, Love Aaj kal songs, 'लव्ह आज कल २' चं नवं गाणं, Haan Main Galat from Love Aaj kal, sara ali khan in Love Aaj kal, kartik aryan in Love Aaj kal, Haan Main Galat new song from Love Aaj kal
'लव्ह आज कल २' चं नवं गाणं, पाहा सारा - कार्तिकचा धमाल डान्स

By

Published : Jan 30, 2020, 9:06 AM IST

मुंबई -अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा 'लव्ह आज कल २' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ट्रेलरनंतर या चित्रपटातील गाणीदेखील सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच सारा आणि कार्तिकच्या जोडीची तरुणाईत क्रेझ वाढत आहे. अशातच त्यांचा धमाल डान्स असलेले एक नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

'लव्ह आज कल २' 'हां मै गलत' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला अरिजीत सिंग आणि शास्वत यांनी स्वरबद्ध केले आहे. तर, प्रितम यांनी संगीत दिले आहे. इरशाद कामिलने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. हे एक पार्टी थिम असणारे गाणे आहे. या गाण्यात सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि आरुषी शर्मा यांच्या धमाल डान्स स्टेप पाहायला मिळतात.

हेही वाचा -'आता तरी वय कमी लिहा', नीना गुप्ताची 'गुगल'ला विनंती

दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाचाच हा सिक्वेल आहे. इम्तियाज अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा -जोकर पुन्हा भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला, १४ फेब्रुवारीला होणार री-रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details