महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मोतीलाल नेहरू यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पायल रोहतगीला अटक - Payal Rohatgi latest news

पायलच्या व्हिडिओवर आक्षेप घेत काँग्रेस नेते चरमेश शर्मा यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तिच्याविरोधात पोलिसांनी  कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Payal Rohatgi detained for objectionable comment on Nehru family
मोतीलाल नेहरू यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पायल रोहतगीला अटक

By

Published : Dec 15, 2019, 4:13 PM IST

मुंबई -बिग बॉसची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री पायल रोहतगी ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह ट्विट करत असते. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकांनाही सामोरे जावे लागते. अलिकडेच तिने जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविषयी आक्षेपार्ह माहिती असलेला व्हिडिओ शेअर केला होता. त्यामुळे तिला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दल खुद्द पायलनेच ट्विट करून माहिती दिली आहे.

'मोतीलाल नेहरू यांच्यावरचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे राजस्थान पोलिसांनी मला अटक केली आहे. मी गुगलवरून माहिती घेऊन हा व्हिडिओ बनवला होता. आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, त्याचा आता विनोद झालाय का, असा प्रश्न तिने आपल्या ट्विटमधुन विचारला आहे.

पायलच्या व्हिडिओवर आक्षेप घेत काँग्रेस नेते चरमेश शर्मा यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे तिच्याविरोधात पोलिसांनी कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details