महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लैंगिक छळ प्रकरणी पायल घोषने घेतली केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची भेट

अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष हिने राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. या प्रकरणामध्ये गृह मंत्रालयाने हस्तक्षेप करण्याची तिने मागणी केली आहे.

Payal Ghosh
पायल घोष

By

Published : Oct 8, 2020, 3:29 PM IST

नवी दिल्ली - चित्रपट निर्माते-दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष हिने बुधवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांची राजधानीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये भेट घेतली.

गृह राज्यमंत्री रेड्डी यांच्यासोबत २० मिनिटांच्या बैठकीनंतर पायलने लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी आली असल्याचे सांगितले. आवश्यकता पडल्यास गृहमंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

यापूर्वी पायलने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांचीही भेट घेतली होती. आयोगाने त्यांना औपचारिक तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

पायलने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "गृह मंत्रालयामध्ये गृह राज्यमंत्री जी. कृष्णा रेड्डी यांच्याशी झालेल्या बैठकीत या विषयावर चांगली चर्चा झाली."

रेड्डी यांची भेट घेण्यापूर्वी अभिनेत्री पायलने ट्विट केले होते, "मी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गृह मंत्रालयात जात आहे. हा लढा शेवटपर्यंत सुरू राहणार असून कोणताही बनावट अजेंडा याला रोखू शकत नाही."

२० सप्टेंबरला पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. १ ऑक्टोबर रोजी रोजी कश्यपला वर्सोवा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते.

या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी पोलिसांनी केली नाही तर आपण उपोषणास बसणार असल्याचेही पायलने म्हटले होते. तिने कश्यप यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती. लैंगिक छळाबाबतची तक्रार पोलिसात आणि दुसरी तक्रार तिने एनसीबीमध्ये केली होती. कश्यप यांची चौकशी ड्रग अँगलने तपासण्याची विनंती तिने यात केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details