हैदराबाद- दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणने २०१६ मध्ये आलेल्या 'पिंक' चित्रपटाच्या तेलुगु रिमेकचे शुटिंग पूर्ण केले आहे. 'वकिल साब' असे या रिमेकचे शीर्षक असून 'पिंक'मध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेली वकिलाची भूमिका यात पवन कल्याण करीत आहे.
रितेश शहा यांनी लिहिलेला आणि अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित मूळ हिंदी पिंक चित्रपटात तीन मुलींची गोष्ट दाखवण्यात आली होती. एका गुन्हात या तीन मुली अडकतात आणि त्यांच्या मदतीला निवृत्त झालेली वकिल येतो अशी याची कथा होती.