हैदराबाद: टॉलीवूड सुपरस्टार पवन कल्याण आणि 'बाहुबली' फेम राणा दग्गुबाती पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. या जोडीने चित्रपट निर्माते सागर के चंद्रा यांच्या चित्रपटात काम करण्याचे निश्चित केले असून याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.
राणा या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर करुन केली आहे. "एका महाकाव्याच्या प्रवासाला आजपासून सुरूवात होईल! आम्ही शक्तीशाली भल्लादेव राणा दग्गुबाती पॉवरस्टार पवन कल्याणसोबत आमच्या १२ व्या प्रॉडक्शनसाठी एकत्र येत असल्यामुळे त्यांचे स्वागत करतो.'', असे ट्विटरवर म्हटले आहे.
अद्याप शीर्षक न ठरलेला हा चित्रपट मल्याळम हिट 'अयप्पाणम कोशियम'चा तेलुगू रिमेक असल्याचे म्हटले जाते. पृथ्वीराज सुकुमारन आणि बिजू मेनन यांनी मुळ चित्रपटात साकारलेल्या भूमिका राणा आणि पवन कल्याण साकारतील.