मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन स्टार्स पवन कल्याण आणि राणा दग्गुबती यांची मुख्य भूमिका असलेल्या 'भीमला नायक' या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर ( Bheemla Nayak Hindi Trailer Release ) शुक्रवारी (४ मार्च) प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अॅक्शन आणि दमदार दृश्यांनी भरलेला आहे. साऊथच्या चित्रपटांच्या अॅक्शन आणि स्टंट्सचेही लोक चाहते आहेत. सागर के चंद्रा दिग्दर्शित हा चित्रपट २५ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
रिपोर्ट्सनुसार 'भीमला नायक'च्या निर्मात्यांनी फेब्रुवारीला हैदराबादच्या युसुफगुडा पोलिस ग्राउंडवर चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित केला होता, परंतु आंध्र प्रदेशचे मंत्री मेकापती गौतम रेड्डी यांच्या आकस्मिक निधनानंतर तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.