महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पती, पत्नी और वो' चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या 'या' चित्रपटांचा मोडला विक्रम - Pati Patni Aur Woh latest news

पहिल्या दिवशीपासूनच 'पती, पत्नी और वो' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉन यांची जोडी असलेला 'पानिपत'ची या चित्रपटाला टक्कर होती.

Pati Patni Aur Woh breaks kartik aryans previous film records
'पती, पत्नी और वो' चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या 'या' चित्रपटांचा मोडला विक्रम

By

Published : Dec 13, 2019, 2:16 PM IST

मुंबई -अभिनेता कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळवले आहे. 'प्यार का पंचनामा' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट हिट झाले आहेत. अलिकडेच कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असलेला 'पती, पत्नी और वो' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्याच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे.

पहिल्या दिवशीपासूनच 'पती, पत्नी और वो' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अर्जुन कपूर आणि क्रिती सेनॉन यांची जोडी असलेला 'पानिपत'ची या चित्रपटाला टक्कर होती. मात्र, 'पानिपत'च्या तुलनेत 'पती, पत्नी और वो'ने बाजी मारली आहे.

हेही वाचा -आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची खास पोस्ट

पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५० कोटीपेक्षा जास्त व्यवसाय करत कार्तिकच्याच इतर चित्रपटांना मागे टाकले आहे. यामध्ये यंदा प्रदर्शित झालेला 'लुकाछुपी', २०१८ साली प्रदर्शित झालेला 'सोनू के टिटू कि स्विटी', २०१५ साली प्रदर्शित झालेला 'प्यार का पंचनामा २' यांचा समावेश आहे. या चित्रपटांनी पहिल्या आठवड्यात ५० कोटीपेक्षा कमी व्यवसाय केला होता. त्यांच्या तुलनेत 'पती, पत्नी और वो'ने पहिल्याच आठवड्यात अर्धशतक गाठले आहे.

कार्तिक आर्यन या चित्रपटानंतर आता सारा अली खानसोबत 'आजकल' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच, 'भूलभुलैय्या'च्या सिक्वेलमध्येही त्याची वर्णी लागली आहे. यामध्ये तो किआरा आडवाणीसोबत भूमिका साकारणार आहे. याशिवाय 'दोस्ताना'च्या सिक्वेलमध्ये तो जान्हवी कपूरसोबत दिसेल.

हेही वाचा -मराठमोळी संस्कृती दाखवणारं 'तान्हाजी'चं नवं गाणं प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details