मुंबई -बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बायोपिकची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. परिनीती चोप्रा ही या बायोपिकमध्ये सायनाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यासाठी ती बॅडमिंटनचे प्रशिक्षणही घेत आहे. मात्र, प्रशिक्षण घेताना तिच्या मानेला दुखापत झाली होती. यावर तिने उपचारही घेतले. आता ती पुन्हा एकदा बॅडमिंटन कोर्टमध्ये परतली आहे.
परिनीती सोशल मीडियावर आपल्या चित्रपटांचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा एक फोटो शेअर करून तिने तिला दुखापत झाल्याची माहिती दिली होती. आता पुन्हा एक व्हिडिओ शेअर करून तिने बॅडमिंटनसाठी पुन्हा सज्ज झाल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा -....तर 'कुली नंबर १'चा स्टंट वरूणच्या जीवावर बेतला असता...