मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा आगामी 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटातील भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक असल्याचे तिने सांगितले आहे. सोशल मीडियावर तिने तिचा एक फोटो शूट करुन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे सांगितले आहे.
'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या शूटिंगला सुरुवात, भूमिकेविषयी परी म्हणते... - इन्स्टाग्राम
परिणीतीने या चित्रपटातील भूमिकेविषयी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली आहे.
'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या शूटिंगला सुरुवात, भूमिकेविषयी परी म्हणते...
'आम्ही लंडन येथे 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. यामध्ये माझी भूमिका फारच आव्हानात्मक आहे. मला हॉस्टेलमध्ये परत आल्यासारखे वाटत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक लवकरच शेअर करु, असेही तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
परिणीती सिद्धार्थ मल्होत्रासोबतही 'जबरिया जोडी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सायना नेहवालच्या बायोपिकचीही ती तयारी करत आहे.