मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयासोबतच गायनामध्येही पारंगत असलेल्या परिणीतीने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र, तिची रुची अभिनयात नाही तर वेगळ्याच क्षेत्रात होती. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात हे काही खास किस्से...
'लेडीज वर्सेस रिकी बहल', 'इशकजादे', 'शुद्ध देसी रोमान्स', 'हंसी तो फसी', 'गोलमाल ४' आणि 'नमस्ते इग्लंड' यांसारख्या चित्रपटात परिणीतीने भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा - 'पागलपंती'मध्ये भरणार येड्यांची जत्रा, ट्रेलरही लवकरच होणार प्रदर्शित
तिचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ साली हरियाणाच्या अंबाला येथे झाला होता. प्रियांका चोप्राची ती चुलत बहीण आहे.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी परिणीतीला इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअर करायचं होतं. तिने बिझनेस स्कुलमधुन बिझनेस, फायनांस आणि अर्थशास्त्र या विषयात ऑनर्सची पदवी मिळवली आहे. इन्वेस्टमेंट बँकर म्हणूनही तिने काही वर्ष काम केले आहे.
२०११ साली तिने 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटात तिची मुख्य भूमिका नव्हती. मात्र, तिला सर्वोत्कृष्ट डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 'इशकजादे' या चित्रपटात ती अर्जुन कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय चित्रपट ज्युरीकडून पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा - रेहासोबत सिक्रेट हॉलिडेवर गेलाय सुशांत, फोटोंनी उलगडलं गुपीत
यशराज बॅनरसोबत काम करत असताना परिणीतीने अभिनेत्री राणी मुखर्जीच्या पीएचंही काम केलं आहे. राणीनेच तिला पहिल्यांदा अभिनेत्री बनण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर परिणीतीने अभिनयात एन्ट्री घेतली.
अभिनयासोबतच तिला गायनाचीही आवड आहे. बॉलिवूडच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने गाणी गायली आहेत. आज तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.
लवकरच ती आगामी 'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सायना नेहवालच्या बायोपिकमध्येही ती भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा - 'तानाजी - द अनसंग वॉरिअर'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख जाहीर