मुंबई -बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा आगामी 'तुफान' चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट एका बॉक्सरच्या जीवनावर आधारित आहे. हा कोणाचाही बायोपिक नसला, तरीही या चित्रपटातून बॉक्सरची कथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी फरहान प्रचंड मेहनत घेताना दिसतो. या चित्रपटात त्याला बॉक्सिंगचे धडे देण्यासाठी बॉलिवूडच्या एका ज्येष्ठ अभिनेत्याची वर्णी लागली आहे.
अभिनेते परेश रावल हे फरहानला बॉक्सिंगचे धडे देणार आहेत. 'तुफान'मध्ये ते त्याच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहेत.