मुंबई- 'दृष्यम-२' या गाजलेल्या मल्याळम चित्रपटाच्या सिक्वेलचे हिंदी रिमेकचे हक्क पॅनोरमा स्टुडिओज इंडरनॅशनलने घेतले आहे. याची अधिकृत घोषणा स्टुडिओने केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शन यांनी ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे.
''पॅनोरमा स्टुडिओज इंडरनॅशनलच्या कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी 'दृष्यम-२' चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क घेतले आहे. चित्रपटासंबंधी महत्वाचा तपशील व दिग्दर्शक याबद्दलची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.'', असे तरण आदर्श यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
'दृष्यम-२' हा चित्रपट अलिकडे मल्याळममध्ये रिलीज झाला होता. जीतू जोसेफ यांनी या चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. २०१३ मध्ये आलेल्या 'दृष्यम' चित्रपटाचा हा सिक्वेल होता. या चित्रपटात मोहनलाल यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन निशीकांत कामत यांनी केले होते. यामध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती.
'दृष्यम-२' चित्रपटाचा हिंदी रिमेक आता बनेल. परंतु निशीकांत कामत यांचे काही महिन्यापूर्वी हैदराबादमध्ये निधन झाले होते. त्यामुळे या हिंदी रिमेकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कोणावरची दिली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - दृष्यम २ : मोहनलाल यांना आहे क्राईम थ्रिलर्सचे आकर्षण