महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Panghrun Trailer Launch : ‘पांघरूण' चित्रपटाचे ट्रेलर झाले प्रदर्शित - प्रवीण तरडेची प्रमुख भूमिका

‘अंतिम’ आणि ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ ला सुद्धा त्यांचे दिग्दर्शन केलेले महेश मांजरेकर यांचा ‘पांघरूण’ या चित्रपटाचे (Panghrun Movie release) नुकतेच ट्रेलर प्रदर्शित झाले. या ट्रेलरमध्ये १९६०च्या आसपासचा काळ दिसत असून निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडत आहे.

Panghrun Trailer Launch
Panghrun Trailer Launch

By

Published : Jan 25, 2022, 3:09 PM IST

मुंबई -महेश मांजरेकर हे नेहमीच असामान्य विषय हाताळत असतात. काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांचेच होते आणि सलमान खानच्या ‘अंतिम’ आणि ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ ला सुद्धा त्यांचे दिग्दर्शन लाभले होते. आता ते अजून एक विलक्षण प्रेमकहाणी घेऊन येत आहेत, ‘पांघरूण’ या चित्रपटातून (Panghrun Movie release) नुकतेच त्याचे ट्रेलर प्रदर्शित झाले.

ट्रेलरमध्ये १९६०च्या आसपासचा काळ दिसत असून निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडत आहे. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते. वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. तिच्या आयुष्याचा संसारिक प्रवास कसा होतो हे हळूहळू उलगडत जाणारी एक विलक्षण प्रेम कहाणी प्रेक्षकांना 'पांघरूण' मध्ये अनुभवायला मिळणार आहे.

डॉ. सलील कुलकर्णींचे संगीत शब्दबध्द
महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचे संगीत लाभले आहे तर वैभव जोशी यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. याशिवाय यात संत तुकाराम आणि संत सावळा माळी यांचे अभंग आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, प्रवीण तरडे, सुरेख तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पांघरूण’च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर रसिक प्रेक्षकांना सुरेल, अविस्मरणीय संगीत व भावनिक दर्जेदार असे कथानक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

पांघरुण येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित चित्रपट 'पांघरुण' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी प्रेक्षकांचा टीझरलाही भरभरून प्रतिसाद लाभला होता. चित्रपटातील गाण्यांचेही संगीतप्रेमींकडून भरभरून कौतुक होत असतानाच आता 'पांघरूण'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे आता 'पांघरूण' विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. हा एक चित्रपट नसून ही एक कलाकृती आहे, असे चित्रपट जाणकार सांगतात. " या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनोखी प्रेमकहाणी अनुभवायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांनी उत्तम कथानकासोबतच सांगितिक खजिना प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. महेश मांजरेकर हे एक असे दिग्दर्शक आहेत, जे नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. उत्कृष्ट विषय हाताळण्यात महेश मांजरेकर अव्वल आहेत. याशिवाय सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे 'पांघरूण'च्या प्रदर्शनाबाबत प्रेक्षकांसोबत आम्हीही खूप उत्सुक आहोत.''

गाण्यांचे रसिक प्रेक्षकांकडून कौतुक
महेश मांजरेकर 'पांघरूण'बद्दल म्हणाले, "आता हळूहळू अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होऊ लागले आहेत आणि मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत, त्यांच्या या प्रेमामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते. बराच काळ आम्ही चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होतो. अखेर रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना 'पांघरूण' पाहता येणार असल्याने मीसुद्धा खूपच उत्सुक आहे. चित्रपटातील गाण्यांचे रसिक प्रेक्षकांकडून जे कौतुक होत आहे, याचा खूप आनंद आहे. प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. 'पांघरूण'चे संगीत सुद्धा उत्तम झाले आहे. प्रेक्षकांनी आजवर ज्याप्रमाणे माझ्या इतर चित्रपटांवर प्रेम केले तसेच प्रेम 'पांघरूण'वरही करतील, याची खात्री आहे.

हेही वाचा -वाढदिवस साजरा न केल्याबद्दल इरफान खानला अखेर सुतापा सिकदरने केले 'माफ'

ABOUT THE AUTHOR

...view details