महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पहिल्याच चित्रपटात सनी देओलच्या मुलाचा लिपलॉक, टायटल ट्रॅक प्रदर्शित - धर्मेंद्र

'पल पल दिल के पास' चित्रपटात करणसोबत सहिर लांबा झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये दोघांचीही झलक पाहायला मिळाली. आता या चित्रपटातलं पहिलं गाणंदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.

पहिल्याच चित्रपटात सनी देओलच्या मुलाचा लिपलॉक, टायटल ट्रॅक प्रदर्शित

By

Published : Aug 27, 2019, 5:37 PM IST

मुंबई -अभिनेता सनी देओलचा मुलगा करण बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टायटल ट्रॅक नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटात करणचा लिपलॉक सीन पाहायला मिळणार आहे.

'पल पल दिल के पास' चित्रपटात करणसोबत सहिर लांबा झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये दोघांचीही झलक पाहायला मिळाली. आता या चित्रपटातलं पहिलं गाणंदेखील प्रदर्शित करण्यात आलं आहे. करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील गाण्याची लिंक शेअर केली आहे.

'पल पल दिल के पास' प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा नवं पोस्टर

आत्तापर्यंत सर्वांनी धर्मेंद्र आणि सनी देओलला चित्रपटात अॅक्शन करताना पाहिलं आहे. मात्र, 'पल पल दिल के पास' हा एक रोमॅन्टिक चित्रपट असणार आहे. अद्याप या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. मात्र, याचं पहिलंच गाणं सोशल मीडियावर हिट ठरत आहे. शिवाय अरिजीत सिंगच्या आवाजानेही या गाण्याला चार चांद लावले आहेत. २० सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details