मुंबई -प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून 'पद्म' पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये १४१ 'पद्म' पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ७ 'पद्म विभूषण', १६ 'पद्म भूषण' आणि ११८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापैकी बॉलिवूडच्या काही कलाकारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या नावाचाही समावेश आहे.
करण जोहरला हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो भावुक झालेला दिसला. त्याने ट्विटरवरुन सर्वांचे धन्यवाद मानले. तसेच आपल्या वडिलांसाठीही त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहलेय, की 'असं खूप कमी वेळा होतं की मी भावनांना शब्दात व्यक्त करु शकत नाही. हा देखील असाच क्षण आहे. 'पद्मश्री'. देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला हा सन्मान मिळत असल्याने आज फार अभिमान वाटत आहे'.