मुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या यशाच्या शिखरावर विराजमान असलेला आयुष्यमान खुराणा एका नव्या बातमीमुळे आनंदात आहे. त्याच्या गाजलेल्या सिनेमांचे रिमेक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत होणार आहेत. चित्रपटांमध्ये भाषा, संस्कृती आणि सीमा ओलांडण्याचे सामर्थ्य आहे, असे तो मानतो.
आयुष्यमानचे पाच चित्रपटांचे रिमेक तेलुगु आणि तामिळ भाषेत होणार आहे. तेलुगू आणि तामिळ भाषेत अंधाधुनचा रिमेक केला जात आहे, तेलुगूमध्ये ड्रीम गर्ल, विकी डोनर तामिळमध्ये बनविला गेला आहे. तमिळ भाषेत आयुष्मानच्या सेक्शन 15चा रिमेक करण्याचीही चर्चा आहे, तर बधाई हो या चित्रपटाचा रिमेक तेलुगू भाषेत होणार आहे.