मुंबई - बहुचर्चित आरआरआर चित्रपटातील ज्युनियर एनटीआरचा स्मॅशिंग फर्स्ट लूक अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. भीम ही व्यक्तीरेखा तो साकारत आहे. एका बलदंड क्रांतिकारकाच्या भूमिकेतील ज्युनियर एनटीआरचा एका जबरदस्त लूकमध्ये यात दिसला आहे.
एसएस राजामौली हे सर्वोत्कृष्ट कथाकथन करतात, हे या व्हिडिओतून पुन्हा सिध्द होत आहे, असे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी म्हटले आहे. त्यांनी या व्हिडिओची लिंक ट्विट केली आहे.
खूप काळापासून हा लूक रिलीज करणे प्रलंबित होते. अखेर आज २२ ऑक्टोबरला हा लूक प्रसिद्ध झाला. राम चरण याच्या रामा राजू या व्यक्तीरेखेचा लूक लोकांना प्रचंड आवडला होता. एसएस राजामौली यांचे दिग्दर्शन असलेला आरआरआर हा चित्रपट डीवीवी दानय्या निर्मित असून त्यांच्या डीवीवी एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली बनत आहे.
या चित्रपटात एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिसलह अनेक दिग्गज कलाकार काम करीत आहेत.
ही एक काल्पनिक कथा असून ती स्वातंत्र्यसेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या भोवती गुंफली आहे. ज्यांनी ब्रिटिश आणि हैदराबादचा निजाम यांच्याविरुद्ध लढाई लढली होती. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज केला जाणार आहे.