महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ऑस्कर'मध्ये बाजी मारलेल्या त्या बहिणींना नोकरीवरून काढलं - financial crises

'पिरियड-एन्ड ऑफ द सेंटेन्स' आ लघुमाहितीपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले होते. काथिखेडा येथील सॅनिटरी पॅड बनवण्याच्या कारखान्यात कामाला असणाऱ्या या दोन्ही बहिणींना नोकरीवरून काढण्यात आले आहे.

'ऑस्कर'मध्ये बाजी मारलेल्या त्या बहिणींना नोकरीवरून काढलं

By

Published : Jun 3, 2019, 12:33 PM IST

मुंबई -ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'पिरियड-एन्ड ऑफ द सेंटेन्स' या माहितीपटाने बाजी मारली होती. या माहितीपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या स्नेहा आणि त्यांची बहीण सुमन यांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. नोकरीअभावी त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काथिखेडा येथील सॅनिटरी पॅड बनवण्याच्या कारखान्यात कामाला असणाऱ्या या दोन्ही बहिणींना नोकरीवरून काढण्यात आले आहे. त्यांच्या 'पिरियड-एन्ड ऑफ द सेंटेन्स' आ लघुमाहितीपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळाले होते. त्यांना बक्षिस स्वरुपात मिळालेली १ लाख रुपयांची रक्कम त्यांनी 'फ्लाय' ही फॅक्टरी आणि संबंधित एनजीओला द्यावी, अशी मागणी त्यांना करण्यात आली होती. मात्र, या दोन्हीही बहिणींनी असे करण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्यांना नोकरीवरुन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, स्नेहा यांनी सांगितले, की 'आम्ही ही स्वयंसेवी संस्था सोडली आहे. आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा पगारही मिळाला नाही. त्यांनी सुमनला पुरस्कारात मिळालेल्या बक्षीसाची रक्कम देण्याची मागणी केली होती'.

ABOUT THE AUTHOR

...view details