महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

One Four Three : ‘वन फोर थ्री' चित्रपटाचा टिझर सोशल मिडीयावर प्रदर्शित - मधु आणि विशुची प्रेमकहाणी

'हे आपलं काळीज हाय' म्हणणाऱ्या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या रोमँटिक टिझरची सर्वत्र चर्चा होत आहे. मधु आणि विशुची प्रेमकहाणी रेखाटणारा हा सिनेमा प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरणार.

One Four Three
One Four Three

By

Published : Jan 29, 2022, 12:50 PM IST

Updated : Jan 29, 2022, 5:16 PM IST

मुंबई -नुकत्याच चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'झोंबिवली' (ZOMBIVLI) चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी 'वन फोर थ्री' (ONE FOUR THREE) चित्रपटाच्या टिझरची झलक दाखवण्यात आला आहे. 'हे आपलं काळीज हाय' म्हणणाऱ्या 'वन फोर थ्री' चित्रपटाच्या रोमँटिक टिझरची सर्वत्र चर्चा होत आहे. मधु आणि विशुची प्रेमकहाणी रेखाटणारा हा सिनेमा प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरणार.

"हे आपलं काळीज हाय', 'करेन तर मामाचीच' या टॅगलाईनची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 'वन फोर थ्री' हा रिअल लाईफ स्टोरीवर आधारित रोमँटिक चित्रपट 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' आणि विरकुमार शहा निर्मित असून ४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. 'वन फोर थ्री' चित्रपटाचा टिझर पाहून त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेमाचा वर्षाव होत असून सर्वत्र या टिझरची चर्चा रंगली आहे.

‘वन फोर थ्री' चा टीझर
‘वन फोर थ्री' चित्रपटाचा टिझर १ मिनिट ५ सेकंदाचा असून या टिझरमधून संपूर्ण चित्रपटाची झलक स्पष्ट होते. दाक्षिणात्य चित्रपटाची धाटणी असलेल्या या चित्रपटाच्या टिझरमध्येही त्याचे प्रत्यक्ष काही सीन्स नजरेसमोर आहेत. आकंठ प्रेमात बुडालेला नायक आणि नायकाचा प्रवास, दरम्यान आलेले अडथळे वा खलनायकाच्या भूमिकेत उभे ठाकलेले सावट याचा सामना नायकाने कसा केला असेल हे टिझरमधून स्पष्ट होत आहे. टिझरमधून अभिनेता योगेश भोसले आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांच्या लव्हस्टोरीची झलक पाहायला मिळत आहे. तर अभिनेता वृषभ शहाचा खलनायकी रूप पाहायला मिळत आहे.

4 मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'वन फोर थ्री' चित्रपटाच्या टॅगलाईनची चर्चा लहानग्यांपासून ते तरुणाईमध्ये अधिक असून हा चित्रपट आणखी काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मात्र जास्त विलंब न करता हा चित्रपट प्रेमाचे विविध रंग घेऊन ४ मार्चला सोनेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज आहे.
हेही वाचा -अल्लू अर्जुन दुबईहून परतल्यानंतर मुलगी अर्हाने केले गोड स्वागत

Last Updated : Jan 29, 2022, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details