मुंबई - देशभर सुरू असलेल्या काळात रुग्णालयात भरती झाल्याच्या अफवेचं अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी खंडन केलं आहे. आपण घरीच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
नसिरुद्दीन रुग्णालयात दाखल, या अफवेचे स्वतः शाह यांनीच केले खंडन - -RUMORS-OF-HOSPITALIZATION-NASEERUDDIN
अभिनेता नसिरुद्दीन शाहने आपण ठिक असून घरीच असल्याचे म्हटले आहे. घरी राहून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी रुग्णालयात भरती झाल्याच्या अफवेचे खंडन केले आहे.
नसीरुद्दीन शाह
फेसबुकवरून चाहत्यांसाठी हा खुलासा केला आहे. त्यांनी लिहिलंय, ''माझ्या प्रकृतीबद्दल चिंता करणाऱ्या सर्वांचे आभार. त्यांना मी सांगतो की मी ठिक आहे. मी घरी थांबून लॉकडाऊनचे पालन करीत आहे. कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.''
नसिरुद्दीन शाह यांचा मुलगा विवाननेही ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.