प्रयागराज -बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील आणि सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार डॉ. हरिवंश राय बच्चन यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ साली इलाहाबाद येथे झाला होता. बच्चन कुटुंबीयांचं इलाहाबादशी एक घट्ट नातं आहे. मुठ्ठीगंज कटक येथे आजही त्यांचे जुने घर असल्याचे पाहायला मिळते. मात्र, या घराची सध्या दुरवस्था झाली आहे. या घराचा काही भाग त्यांनी नातलगांकडे सोपवला आहे. मात्र, जर्जर अशा या घरात हरिवंशराय बच्चन यांच्या आठवणी आजही कायम आहेत.
येथील नागरिकांनी याबाबत सांगितले की, हरिवंशराय हे त्यांची पत्नी तेजी आणि मुलगा अमिताभ बच्चन यांच्यासोबत याच गल्लीमध्ये राहत असत. जेव्हा अमिताभ बच्चन लहान होते, तेव्हा याच गल्लीत त्याचं बालपण गेलं आहे.