मुंबई - बॉलिवूडमध्ये आजवर बऱ्याच वेगवेगळ्या घटनांवर चित्रपट तयार करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकवरही चित्रपट तयार करण्यात येणार आहे.
संजय लीला भन्साळी हे त्यांच्या ऐतिहासिक, भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. मात्र, आता ते 'बालाकोट एअरस्ट्राईक'वर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
हेही वाचा -'राजनीती'नंतर पुन्हा अजय-रणबीर एकत्र?, लव रंजनने दिले स्पष्टीकरण
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. संजय लिला भन्साळी यांच्यासोबतच भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर हे मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
भारतीय सैन्याला अभिवादन करण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानमध्ये घुसून तेथील बालाकोट, चाकोटी व मुझफ्फराबाद इथं 'जैश-ए-मोहम्मद'च्या तळांवर भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी बॉम्बवर्षाव केला. यात २०० ते ३०० दहशतवादी मारले गेले.
हेही वाचा -मराठमोळी संस्कृती दाखवणारं 'तान्हाजी'चं नवं गाणं प्रदर्शित