महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नुसरत भरुचाचे दमदार कमबॅक, सिद्धार्थसोबत 'या' गाण्यात झळकणार - Tara Sutaria

नुसरत आणि सिद्धार्थशिवाय या चित्रपटात रितेश देशमुख, रकुल प्रित सिंग आणि तारा सुतारीया हे कलाकार देखील झळकणार आहेत.

नुसरत भरुचाचे दमदार कमबॅक, सिद्धार्थसोबत 'या' गाण्यात झळकणार

By

Published : Jun 28, 2019, 11:41 AM IST

मुंबई -अभिनेत्री नुसरत भरुचा ही बऱ्याच दिवसापासून बॉलिवूडपासून लांब होती. मात्र, लवकरच ती बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करत आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या चित्रपटामध्ये ती त्याच्यासोबत डान्स करताना दिसणार आहे. नुकतेच या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

'मरजावां' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील हे गाणं यो यो हनी सिंगच्या आवाजात हे गाणं सादर होणार आहे.

नुसरत आणि सिद्धार्थशिवाय या चित्रपटात रितेश देशमुख, रकुल प्रित सिंग आणि तारा सुतारीया हे कलाकार देखील झळकणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप मिलन जवेरी हे करत आहेत. २ ऑक्टोंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details