बंगळूरू - डॉ. राजकुमार यांच्या नावाने शहरातील राजाजी नगरमध्ये नेत्रपिढी चालवण्यात येते. आतापर्यंत या नेत्रपेढीत 14,901 डोळे दान झाले आहेत. डॉ. राजकुमार यांनीही याच नेत्रपेढीसाठी आपले डोळे दान केले होते. त्यानंतर पुनीत यांच्या आई पर्वतम्मा यांच्या निधननानंतर त्यांनीही नेत्रदान केले होते. आता पुनीत राजकुमारनेही नेत्रदान करीत आई वडिलांचा हा अनोखा वारसा जपला आहे. अभिनेता पुनीत राजकुमार नेत्रदान करणारा त्याच्या कुटुंबातील तिसरा सदस्य बनला आहे.
पुनीत राजकुमार यांचे निधन झाल्याचे घोषीत झाल्यानंतर त्यांचे डोळे काढण्यासाठी वैद्यकीय पथक रुग्णालयात दाखल झाले होते. निधनानंतर सहा तासाच्या आत हे डोळे काढावे लागतात. नेत्रदान केल्यानंतरच त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले होते. ही माहिती पुनीतच्या एका चाहत्याने ट्विटरवर दिली आहे.
वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालेले लोकप्रिय कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे अंत्यसंस्कार 31 ऑक्टोबर रोजी कांतीरवा स्टेडियमवर होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावांशी चर्चा करून तारीख निश्चित केली. दरम्यान, दिवंगत अभिनेत्याची मुलगी दिल्लीहून बेंगळुरूला पोहोचली आहे.