कन्नड पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर उद्या कांतीरवा स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. उद्या किती वाजता अंत्यसंस्कार होणार हे आज संध्याकाळी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलंय. शनिवारी, सीएम बोम्मई, प्रभू देवा आणि राज्यपाल गेहलोत यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत अभिनेत्याला आदरांजली वाहिली. “अप्पू”, “वीरा कन्नडिगा” आणि “मौर्य” यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या 46 वर्षीय अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयात निधन झाले होते. फिटनेस उत्साही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनीतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखू लागल्यानंतर त्याला विक्रम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
पुनीत राजकुमारच्या मृत्यनंतर सँडलवूडसह दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी पुनीत राजकुमारला श्रध्दांजली वाहिली. अनेकांनी सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे. तर अनेक तंत्रज्ञ, लेखक, कलाकार, दिग्दर्शक अंत्यदर्शन घेत आहे.
नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभू देवा यांनी आज दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांना बेंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये अखेरची श्रद्धांजली वाहिली. ''हा एक अतिशय दुःखाचा दिवस आहे. या नुकसानीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत'', असे तो म्हणतो.
बॉलिवूड स्टार अनिल कपूर, सुनिल शेट्टी यांनीही सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे.सुनिल शेट्टी यांनी लिहिलंय, ''पुनीत राजकुमारच्या जाण्याने धक्का बसला. मी कल्पनाही करू शकत नाही की फक्त 46 माझा प्रिय मित्र #PuneethRajkumar आता नाही. माझा सुपरस्टार मित्र आणि एक अद्भुत माणूस खूप लवकर गेला. देव तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि चाहत्यांना शक्ती देवो.''