महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

#MeToo : लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर 'सैराट'च्या गायिकेवरच बहिष्कार - undefined

सैराट झालं जी या गाण्याची गायिका चिन्मयी श्रीपाद हिने तामिळ संगीतकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते...तिला न्याय मिळण्या ऐवजी तिच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार घडलाय...राष्ट्रीय महिला आयोगाकडून न्याय मिळेल अशी तिला खात्री वाटते....

By

Published : Mar 2, 2019, 6:35 PM IST


मुंबई - 'सैराट' चित्रपटातील गाजलेल्या 'सैराट झालं जी' या गाण्याची गायिका चिन्मयी श्रीपाद हिने तामिळ संगीतकारांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. संगीतकार आणि लेखक वैरामुथु यांनी शोषण केल्याचा आरोप तिने केला होता.

चिन्मयीने अभिनेता आणि डबिंग युनियनचे अध्यक्ष राधा रवी यांच्यावरही लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. वैरामुथु यांच्यावर आरोप केल्यानंतर तामिळ फिल्म इंडस्ट्रीने उघडपणे राधा रवी आणि वैरामुथु यांची बाजू घेतल्याचे दिसते. त्यांनी चिन्मयीवर जणू बहिष्कारच टाकला आहे. आरोप झाल्यापासून तिला एकही काम मिळालेले नाही.

डबिंग युनियनने चिन्मयीच्या कामावर बंदीचा निर्णय जाहीर केलाय. युनियनची तिने जाहीर माफी मागत दीड लाख रुपये दंड भरण्यास तिला सांगण्यात आलंय.

राष्ट्रीय महिला आयोगाकडे चिन्मयीने वैरामुथु यांच्याविरोधात तक्रार केली आहे. कायदेशीर मार्गानेच आपल्याला न्याय मिळेल असे तिला ठाम वाटते.

एका इव्हेन्टसाठी स्वीत्झर्लँडला गेले असताना वैरामथु यांच्या हॉटेलवर जाण्यास चिन्मयीने नकार दिला होता. त्यावेळी तिला काम न करु देण्याची धमकीही देण्यात आली होती.

चिन्मयी श्रीपाद हिने तामिळसह हिंदी चित्रपटांसाठीही गायन केलंय. 'सैराट' चित्रपटासाठी 'सैराट झालं जी' हे तिने गायलेले गाणे खूपच लोकप्रिय आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details