महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

#HBDWorldsBiggestMovieStar: ट्विटरवरही शाहरुख 'किंग खान', वाढदिवशी ट्रेण्ड होतोय हॅशटॅग - srk viral videos

एकीकडे सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तर, दुसरीकडे हजारो चाहत्यांनी रात्रीपासूनच त्याच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेर हजेरी लावली होती.

#HBDWorldsBiggestMovieStar: ट्विटरवरही शाहरुख 'किंग खान', वाढदिवशी ट्रेण्ड होतोय हॅशटॅग

By

Published : Nov 2, 2019, 4:46 PM IST

मुंबई -रोमान्सचा बादशाह शाहरुख खानचा आज ५४ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा 'किंग खान' अशी ओळख असणाऱ्या शाहरुखची जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. त्यामुळेच ट्विटरवरही तो खऱ्या अर्थाने 'किंग' ठरला आहे. ट्विटरवर त्याच्या वाढदिवशी #HBDWorldsBiggestMovieStar हा हॅशटॅग सध्या ट्रेण्ड होत आहे. हा हॅशटॅग वापरुन चाहते शाहरुखला शुभेच्छा देत आहेत.

'मन्नत' या बंगल्याबाहेर चाहत्यांची गर्दी

एकीकडे सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तर, दुसरीकडे हजारो चाहत्यांनी रात्रीपासूनच त्याच्या 'मन्नत' या बंगल्याबाहेर हजेरी लावली होती. आपल्या लाडक्या किंग खानला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. शाहरुखनेही आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. त्याने बालकनीत येऊन सर्वांना अभिवादन करत सर्वांचे आभार व्यक्त केले.

शाहरुख बालकनीमध्ये येताच चाहत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. यावेळी फुगे देखील उडवण्यात आले. सोशल मीडियावर त्याचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

हेही वाचा -"सिनियर सिटीझन"मध्ये मोहन जोशी प्रमुख भूमिकेत

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, शाहरुखने अद्याप त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही. मात्र, वाढदिवशी तो त्याच्या चाहत्यांना सरप्राईझ देणार असल्याचं बोललं जात आहे. त्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून आतुर आहेत. आता शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केव्हा करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा - बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

ABOUT THE AUTHOR

...view details