महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘बॉईज लॉकर रूम’ पोस्टमुळे स्वरा भास्कर ट्रोल

सध्या गाजत असलेल्या ‘बॉईज लॉकर रूम’ विषयावर तिने आपले मत व्यक्त केले होते. मात्र ट्रोलर्स तिच्या या मतावरही तुटून पडले आहेत. अर्थात तिच्या सपोर्टमध्येही अनेकांनी मते व्यक्त केली आहेत.

Swara Bhasker gets tolled
स्वरा भास्कर झाली ट्रोल

By

Published : May 6, 2020, 8:34 PM IST

मुंबई - अभिनेत्री स्वरा भास्कर आपली मते अत्यंत ठामपणे मांडत असते. तिच्या राजकीय मतांमुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. सध्या गाजत असलेल्या ‘बॉईज लॉकर रूम’ विषयावर तिने आपले मत व्यक्त केले होते. मात्र ट्रोलर्स तिच्या या मतावरही तुटून पडले आहेत. अर्थात तिच्या सपोर्टमध्येही अनेकांनी मते व्यक्त केली आहेत.

सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर एका खासगी चॅट ग्रुपचा स्क्रिन शॉट लीक झाल्यामुळे ‘बॉईज लॉकर रूम’ हा विषय चर्चेत आला. दिल्लीच्या काही वयात येत असलेल्या मुलांनी हा ग्रुप बनवला होता. यावर त्यांची झालेली अश्लिल चर्चा आणि काही वादग्रस्त फोटोही पाहायला मिळाले होते. या ग्रुपचा स्क्रिन शॉट व्हायरल होताच हा विषय वादग्रस्त ठरला. या ग्रुपमधील मुलांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे.

याबद्दल अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली होती. तिने लिहिलंय, ''ही मुले विषारी मर्दानगीसारखे कसे वागू शकतात. कमी वयाच्या मुलींवर बलात्कार करण्याचा प्लान ते बनवित आहेत. याकडे आई वडिल आणि शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे. ही मुले काय करीत आहेत? आता बलात्काऱ्यांना फासावर लटकवणे इतकेच पुरेसे नाही. अशा मानसिकतेवर हल्ला केला पाहिजे. ही मानसिकताच बलात्कारी निर्माण करते.''

स्वराने ही प्रतिक्रिया देताच तिच्यावर ट्रोलर्स तुटून पडले आहेत. स्वराच्या फेमिनिझमची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details