महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'दिलबर' गाण्यानंतर नोराचा 'साकी' गाण्यात ग्लॅमरस अंदाज, 'बाटला हाऊस'चं पहिलं गाणं प्रदर्शित - dilbar

नोरा फतेहीने दिलबर गाण्यात आपल्या 'बेली डान्स'ची छाप पाडली होती. आता 'साकी' गाण्यातही तिच्या नृत्याचा अविष्कार पाहायला मिळतो. नेहा कक्कर, तुलसी कुमार आणि बी-प्राकने हे गाणे गायले आहे.

'दिलबर' गाण्यानंतर नोराचा 'साकी' गाण्यात ग्लॅमरस अंदाज, 'बाटला हाऊस'चं पहिलं गाणं प्रदर्शित

By

Published : Jul 15, 2019, 4:37 PM IST

मुंबई - बॉलिवूडची डांसिग क्विन नोरा फतेही दरवेळी तिच्या नृत्याने चाहत्यांवर भूरळ पाडत असते. मागच्या वर्षी जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' मध्ये तिने 'दिलबर' गाण्याच्या रिमेकमध्ये धमाकेदार डान्स केला होता. या गाण्याची क्रेझ आजही पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा जॉनच्याच 'बाटला हाऊस' चित्रपटात ती 'साकी साकी' गाण्याच्या रिक्रियेटेड व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतेच हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

नोरा फतेहीने दिलबर गाण्यात आपल्या 'बेली डान्स'ची छाप पाडली होती. आता 'साकी' गाण्यातही तिच्या नृत्याचा अविष्कार पाहायला मिळतो. नेहा कक्कर, तुलसी कुमार आणि बी-प्राकने हे गाणे गायले आहे.

रिक्रियेटेड व्हर्जनबद्दल मुळ गायिका कोयना मित्रा म्हणते -
२००४ साली या गाण्याचे मुळ व्हर्जन प्रदर्शित झाले होते. कोयना मित्रा या गायिकेने हे गाणे गायले होते. तिनेदेखील या गाण्याच्या रिक्रियेटेड व्हर्जनवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत म्हटलेय, की तिला हे रिक्रियेटेड व्हर्जन आवडले नाही. बाटला हाऊसमध्ये हे गाणे घेण्याची काय गरज होती, असा प्रश्नही तिने विचारला तिच्या ट्विटमध्ये विचारला आहे. तसेच नोराच्या डान्सची प्रशंसाही तिने केली आहे.

नोरा बिग बॉस सीझन ९ पासून फार चर्चेत आली होती. या शोमध्येच तिने तिच्या नृत्याविष्काराची झलक दाखवून दिली होती. पुढे तिला 'सत्यमेव जयते' चित्रपटात ब्रेक मिळाला. 'दिलबर' गाण्यामुळेती खूप प्रसिद्ध झाली.

वरुण धवन, श्रद्धा कपूरसोबत ती 'स्ट्रिट डान्सर' या चित्रपटातही झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यापुर्वी 'बाटला हाऊस' हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details