महाराष्ट्र

maharashtra

'सियाचीन वॉरिअर्स'च्या निर्मितीसाठी नितेश तिवारी अन् अश्विनी अय्यर तिवारी येणार एकत्र

By

Published : Feb 3, 2020, 12:40 PM IST

काही दिवसांपूर्वीच नितेश आणि अश्विनी अय्यर तिवारी यांनी सुधा आणि नारायण मुर्ती यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करत असल्याची घोषणा केली. आता 'सियाचीन वॉरिअर्स' या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत.

The Siachen Warriors film news, Nitesh Tiwari and Ashwiny Iyer Tiwari unite for Siachen Warriors, Nitesh Tiwari films, Ashwiny Iyer Tiwari films, सियाचीन वॉरिअर्स' चित्रपट, नितेश तिवारी - अश्विनी अय्यर तिवारी,
'सियाचीन वॉरिअर्स'च्या निर्मितीसाठी नितेश तिवारीसह एकत्र येणार अश्विनी अय्यर तिवारी

मुंबई -आजकाल बॉलिवूडमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट तयार होत आहेत. यामध्ये बायोपिक, क्रीडा, सामाजिक विषय यांसारख्या विषयांवर अधिक भर दिला जात आहे. भारतीय सैन्यावर आधारितही बरेच चित्रपट आजवर आपल्याला पाहायला मिळाले. मात्र, सियाचीन येथील सैनिकांवर आधारित चित्रपट पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी दंगल फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आणि 'पंगा'च्या दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी एकत्र आले आहेत.

अश्विनी अय्यर या नितेश तिवारी यांच्या पत्नी आहेत. अलिकडेच त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'पंगा' चित्रपट प्रदर्शित झाला. महिला कबड्डी खेळाडूवर आधारित हा चित्रपट होता. काही दिवसांपूर्वीच नितेश आणि अश्विनी अय्यर तिवारी यांनी सुधा आणि नारायण मुर्ती यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तयार करत असल्याची घोषणा केली. आता 'सियाचीन वॉरिअर्स' या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत.

हेही वाचा -'बागी ३' च्या पहिल्या पोस्टरमध्ये टायगरचा दमदार अवतार, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

महावीर जैन यांच्यासोबत मिळून ते या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर, संजय शेखर शेट्टी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. पियुष गुप्ता आणि गौतम वैद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. यामध्ये कोणते कलाकार भूमिका साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा -'थप्पड'च्या ट्रेलरला १० मिलियन व्ह्युज, तापसीने शेअर केला व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details