मुंबई - बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी यांनी 'डायल 100' चित्रपटाची घोषणा केली असून, यामध्ये नीना गुप्ता आणि साक्षी तंवरदेखील मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
मनोज बाजपेयी यांनी या चित्रपटाविषयी माहिती देताना सोशल मीडियावर लिहिले, “माझ्या अत्यंत प्रतिभावंत आणि सुंदर सहकलाकार नीना गुप्ता आणि साक्षी तंवर यांच्यासह रेन्सिल डीसिल्वा दिग्दर्शित‘ डायल 100 ’या पुढच्या थ्रिलर चित्रपटाची घोषणा करताना मला आनंद झाला आहे. मी आधीच नाट्य आणि सस्पेन्सच्या प्रेमात आहे. हा प्रवास सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. "
हेही वाचा - ईटीव्ही भारत स्पेशल;- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील 'बारा भानगडी'