मुंबई - 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे नाव आता ग्लोबल झालं आहे. ग्लोबल स्टार्स म्हणून दोघांनाही ओळखलं जातं. डिसेंबर महिन्यात प्रियांकानं निकसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघाचीही जोडी लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली. आज निकचा २७ वा वाढदिवस आहे. प्रियांका निकपेक्षा १० वर्षाने मोठी आहे. मात्र, प्रियांकाच नाही, तर निकने तिच्याआधीदेखील वयापेक्षा मोठ्या असलेल्या अभिनेत्रींना डेट केलं आहे. याचा खुलासा त्यानेच एका चाट शोमध्ये केला होता.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, डेमीची मुलगी रुमर मिल्स हिच्याद्वारे दोघांची भेट झाली होती. तिच्याशिवाय निकने त्याच्यापेक्षा ७ वर्षांनी मोठी असलेली ऑस्ट्रेलियन अभिनेत्री डेल्टा गुडरेम हिला डेट करत होता. त्यानंतर १३ वर्षांनी मोठी केट हड्सनलाही त्याने डेट केलं आहे. यामध्ये सर्वात मोठी ही प्रियांकाच आहे.
हेही वाचा-राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री वनराज भाटियांवर उपासमारीची वेळ