मुंबई - अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश असलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित अशा 'मिशन मंगल' या चित्रपटाचा एक ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. भारताच्या स्वप्नपूर्तीची ही असामान्य कथा आहे. हा चित्रपट भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित आहे. आता या चित्रपटाचा आणखी एक नवा ट्रेलर आज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
'मिशन मंगल'चा नवा ट्रेलर आज होणार प्रदर्शित, पाहा कलाकारांचे नवे लूक - आर. बाल्की
अक्षयसह सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, शरमन जोशी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
अक्षयसह सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, तापसी पन्नू, नित्या मेनन, शरमन जोशी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. भारताच्या मंगळयान मोहिमीची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. भारतीय वैज्ञानिकांनी या मोहिमेसाठी खूप मेहनत घेतली होती.
मंगळयान मोहिमेत महिला वैज्ञानिकांनी दिलेलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटातून मंगळयान मोहिमेसाठी महिला आणि भारतीय वैज्ञानिकांनी दिलेलं योगदान अधोरेखित केलं आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर करुन कलाकारांचे नवे लूक देखील शेअर केले आहेत.
जगन शक्ती यांनी 'मिशन मंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर 'पॅडमॅन' चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
'मिशन मंगल' अशा वीरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे