मुंबई - दिग्दर्शक विक्रम भट्ट हे थरारक भयपटांसाठी ओळखले जातात. '१९२०' आणि 'हाँटेड' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे विक्रम भट्ट यांचा 'घोस्ट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच अंगावर काटे ऊभे राहतात. २०११ सालीच हा चित्रपट तयार करण्याची सुरुवात झाली होती. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील सनाया ईरानी ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, शिवम भार्गव हा अभिनेताही यामध्ये झळकणार आहे. विक्रम भट्ट स्वत:ही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.