मुंबई -अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला 'विक्की वेलिंगकर' या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. तसेच यातील 'टीकी टीकी टॉक' हे गाणंदेखील यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आता या चित्रपटातील ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.
विक्की वेलिंगकर या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.