महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्मान खुराना - नुसरत भरुचाची रोमॅन्टिक केमेस्ट्री, पाहा 'ड्रीमगर्ल'चं नवं गाणं - राज शांडिल्य

'एक मुलाकात' असे या गाण्याचे बोल आहेत. मित ब्रोस आणि पलक मुचल यांच्या आवाजात हे गाणं आहे. शब्बिर अहमद यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, मित ब्रोस यांनीच संगीत दिलं आहे.

आयुष्मान खुराना - नुसरत भरुचाची रोमॅन्टिक केमेस्ट्री, पाहा 'ड्रीमगर्ल'चं नवं गाणं

By

Published : Sep 3, 2019, 5:24 PM IST

मुंबई -अभिनेता आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांची जोडी असलेला 'ड्रीमगर्ल' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील आत्तापर्यंत तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. 'राधे राधे', 'रिंग रिंग' आणि 'ढगाला लागली कळ' या तीनही गाण्यांनी चाहत्यांची चांगली पसंती मिळाली आहे. आता या चित्रपटातंल नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात आयुष्मान आणि नुसरतची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते.

'एक मुलाकात' असे या गाण्याचे बोल आहेत. मित ब्रोस आणि पलक मुचल यांच्या आवाजात हे गाणं आहे. शब्बिर अहमद यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, मित ब्रोस यांनीच संगीत दिलं आहे.

हेही वाचा-हिमेश रेशमियाच्या 'या' गाजलेल्या गाण्याला राणू मंडलचा स्वरसाज, रेकॉर्ड केलं तिसरं गाणं

'ड्रीमगर्ल' मध्ये आयुष्मान खुरानाचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चाहत्यांना चित्रपटाची प्रचंड आतुरता लागली आहे.
या चित्रपटात आयुष्मानसोबत अन्नु कपूर, विजय राज, अभिषेक बॅनर्जी, मनज्योत सिंग, निधी बिस्ट, राजेश शर्मा, राज भन्साळी हे कलाकार झळकणार आहेत.

हेही वाचा-साहोनं फर्स्ट विकेंडला केली तुफान कमाई; मात्र, नाही मोडू शकला बाहुबली २चा विक्रम

राज शांडिल्य यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तसेच, या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करत आहेत. तर, एकता कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १३ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details