महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बायपास रोड' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार रिलीज - New release date for Bypass Road

'बायपास रोड' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आता ८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बायपास रोड

By

Published : Oct 24, 2019, 4:49 PM IST


'बायपास रोड' या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात येणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती ट्विट करुन दिली आहे.

या चित्रपटाचे आकर्षक नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. नील नितीन मुकेश याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलचा भाऊ नमन मुकेश करीत आहे. नमन मुकेशचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे.

'बायपास रोड' या चित्रपटात नील नीतिन मुकेशसोबत अधा शर्मा ही अभिनेत्री काम करीत असून गुल पनंग, शमा सिकंदर, रजीत कपूर, सुधांशू पांडे, मनिष चौधरी आणि ताहेर शब्बीर यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details