महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा, 'कलंक'मधील आलिया आणि संजय दत्तची पहिली झलक - varun dhawan

गुरूवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या वरूणच्या पोस्टरनंतर आता चित्रपटातील आलियाचा खास लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात आलिया लाल रंगाच्या लहेंग्यात दिसत आहे.

कलंक

By

Published : Mar 8, 2019, 1:28 PM IST

मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेला 'कलंक' चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटात वरूण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्तसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. आता या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक गुरूवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

गुरूवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या वरूणच्या पोस्टरनंतर आता चित्रपटातील आलियाचा खास लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात आलिया लाल रंगाच्या लहेंग्यात दिसत आहे. यासोबतच तिने डोक्यावरही पारंपरिक पद्धतीने लाल रंगाची ओढणी घेतली आहे. आलिया या चित्रपटात रूप हे पात्र साकारणार आहे. यासोबतच आदित्या रॉय कपूर आणि संजय दत्त यांचे जबरदस्त लूकदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

अभिषेक वर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर करण जोहर आणि साजिद नाडियादवाला यांची निर्मिती आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details