महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'केजीएफ 2' चे नवे पोस्टर रिलीज - 'केजीएफ 2' मध्ये अधिराच्या भूमिकेत संजय दत्त

संजय दत्तच्या वाढदिवाच्या निमित्ताने केजीएफ 2 या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले आहेत. 'केजीएफ2' च्या रिलीजची प्रतीक्षा करणाऱ्यांना त्याने म्हटलंय की तुमची प्रतीक्षा योग्य आहे.

new-poster-of-kgf2
'केजीएफ 2' चे नवे पोस्टर रिलीज

By

Published : Jul 29, 2021, 3:18 PM IST

'केजीएफ 2' चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या नव्या पोस्टरने अनावरण करण्यात आले आहे. या पोस्टरवर संजय दत्त भूमिका साकारत असलेल्या 'अधिरा' या व्यक्तीरेखेचा करारी फोटो पाहायला मिळतो. संजय दत्त यात खलनायकाची भूमिका करीत आहे.

'केजीएफ 2' हा चित्रपट बहुप्रतीक्षित आहे. सुपरस्टार यशची प्रमुख भूमिका असेल्या या चित्रपटात संजय दत्तसह श्रीनिधी शेट्टी, रविना टंडन यांच्याही भूमिका आहेत. प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेला 'केजीएफ 2' हा चित्रपट विजय किरागंदूर यांची निर्मिती आहे.

या नव्या पोस्टरमध्ये अधिरा हातात तलवार घेऊन आपल्या मोहीमेवर निघालेला दिसतो. अधिराची दहशत या पोस्टरमध्ये स्पष्ट पाहायला मिळत आहे. हे पोस्टर समिक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे.

संजय दत्तनेही वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. '' 'केजीएफ 2' मध्ये काम करीत आहे ती कमालीची गोष्ट आहे. खूप काळापासून या सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा करीत आहात याची मला कल्पना आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमची ही प्रतीक्षा योग्य होती.'', असे संजय दत्तने म्हटले आहे.

विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी संजय दत्तच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे 29 जुलै 2019 रोजी केजीएफ2 मधील अधिराच्या फर्स्ट लूकची घोषणा झाली होती. त्यावेळी पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते.

हेही वाचा - आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details