महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'कलंक'चं नवं पोस्टर लाँच, पाहा वरुणचा जबरदस्त लूक - new look

करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन हे करत आहेत. हा चित्रपट एप्रिल महिन्यात १७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वरूण

By

Published : Mar 14, 2019, 4:09 PM IST

मुंबई- तगडी स्टारकास्ट असलेल्या 'कलंक' चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकही फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटाचे कथानक काय आहे, याबद्दलही प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.


अशात आता चित्रपटातील वरूणचा आणखी एक खास लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या फोटोत वरूण मैदानात एका सांडसोबत लढताना दिसत आहे. चित्रपटात वरूण धवन जफर नावाचं पात्र साकारणार आहे. चित्रपटात वरूणशिवाय आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


करण जोहरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन हे करत आहेत. हा चित्रपट एप्रिल महिन्यात १७ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details