महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा 'हाऊसफुल'चं नवं पोस्टर, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित - kriti kharbanda

'हाऊसफुल', 'हाऊसफुल २' आणि 'हाऊसफुल ३' या चित्रपटांच्या यशानंतर 'हाऊसफुल ४' या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत.

पाहा 'हाऊसफुल'चं नवं पोस्टर, ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By

Published : Sep 26, 2019, 10:37 AM IST

मुंबई -अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांची मुख्य भूमिका असलेल्या 'हाऊसफुल ४'चं अलिकडेच पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरची बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना आतुरता होती. आता या चित्रपटाचं आणखी एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसंच ट्रेलरही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २७ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

हेही वाचा -स्कोर ट्रेंड्स इंडिया चार्टवर अक्षय कुमारचा 'मिशन ऑगस्ट' यशस्वी

'हाऊसफुल', 'हाऊसफुल २' आणि 'हाऊसफुल ३' या चित्रपटांच्या यशानंतर 'हाऊसफुल ४' या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांच्या फार अपेक्षा आहेत.

अभिनेत्री, क्रिती सेनॉन, पुजा हेगडे आणि क्रिती खारबांदा यांची देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे.

दिग्दर्शक फरहाद समजी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, साजिद नादियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
दिवाळीच्या पर्वावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'द कपिल शर्मा शो'मध्ये टायगरच्या गायनाने प्रेक्षक झाले चकित

ABOUT THE AUTHOR

...view details