मुंबई- बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आपल्या अभिनयाशिवाय कवितांमुळेही चर्चेत असतो. अनेक नवनवीन कविता तो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. इतकंच नाही तर स्वतःच्या अनेक गाण्यांना आणि कवितांना तो आपल्याच आवाजत अधिक खास बनवत असतो. अशीच खास कविता आयुष्मानने गायली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून.
एक लडकी ऐसी है जो बचपन में बडी हो गयी’, असे बोल असलेली केवळ २ मिनिटांची ही कविता खूप काही सांगून जाते. एका स्त्रीला लहानपणापासूनच अनेक गोष्टींच्या कराव्या लागणाऱ्या सामन्याचं भीषण वास्तव या कवितेतून त्यानं मांडलं आहे. या कवितेतून त्यानं स्त्रीचं आपल्या जीवनातील स्थान, तिचं महत्त्व आणि अस्तित्वावर भाष्य केलं आहे.