महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रेमाची नवी अनुभूती देणाऱ्या 'हॅशटॅग प्रेम' मधून प्रेमाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न!

'हॅशटॅग प्रेम' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांना प्रेमाची नवी अनुभूती देणारा ठरणार आहे. जेश बाळकृष्ण जाधव यांनी 'हॅशटॅग प्रेम'चं दिग्दर्शन केलं आहे. अरविंद गोविंद पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. यापूर्वी एकदा प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेला 'हॅशटॅग प्रेम' नव्या जोमानं रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'हॅशटॅग प्रेम' येत्या १७ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे.

हॅशटॅग प्रेम
हॅशटॅग प्रेम

By

Published : Dec 9, 2021, 8:24 PM IST

प्रेम ही भावना प्रत्येकालाच स्पर्श करीत असते. तसेच प्रत्येकाच्या प्रेमाची अनुभूती वेगळी असते. साहजिकच अनादी काळापासून प्रेमावर अनेक चित्रपट बनले आणि बनत राहतील. त्यातीलच एक म्हणजे येऊ घातलेला मराठी चित्रपट ‘हॅशटॅग प्रेम’. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...' अशी कवीवर्य मंगेश पाडगावकरांसह बऱ्याच कवींनी आपापल्या परीनं प्रेमाची व्याख्या केली आहे, पण प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेम अनोखेच असते. याच कारणामुळं आजही प्रेम हा विषय निर्माता-दिग्दर्शकांइतकाच रसिकांनाही आपलासा वाटत असते. त्यामुळंच नवनवीन प्रेमकथा रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यातून प्रेमाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'हॅशटॅग प्रेम' हा मराठी चित्रपटही प्रेक्षकांना प्रेमाची नवी अनुभूती देणारा ठरणार आहे.

'हॅशटॅग प्रेम' या चित्रपटातही आम्ही प्रेमाचे दुर्लक्षित पैलू सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. दमदार पटकथा, कसलेले कलावंत, मन तृप्त करणारं गीत-संगीत, दर्जेदार तांत्रिक बाबी आणि उत्तम सादरीकरण इत्यादी 'हॅशटॅग प्रेम'च्या जमेच्या बाजू असल्याचं प्रेक्षकांनाही हा चित्रपट पाहताना नक्कीच जाणवेल अशी आशाही जाधव यांनी व्यक्त केली आहे. प्रेमकथा असूनही हा चित्रपट कोणताही भेदभाव न करता सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी होईल आणि सर्वचजण याचं कौतुक करतील असं निर्माते अनिल गोविंद पाटील यांचं म्हणणं आहे.

हॅशटॅग प्रेम

खरं तर घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कायम प्रकाशझोतात राहिला आहे. 'हॅशटॅग प्रेम' प्रेम हे आजच्या तरुणाईसह अबालवृद्धांचं लक्ष वेधून घेणारं टायटल आणि नवी कोरी नायक-नायिकांची जोडी हे या चित्रपटाचं प्रथमदर्शनी आकर्षणाचं केंद्र बनलं. राजेश बाळकृष्ण जाधव यांनी 'हॅशटॅग प्रेम'चं दिग्दर्शन केलं आहे. अरविंद गोविंद पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. यापूर्वी एकदा प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेला 'हॅशटॅग प्रेम' नव्या जोमानं रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हॅशटॅग प्रेम

मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मितालीनं मराठीपासून हिंदीपर्यंत आपला वेगळा चाहतावर्ग तयार केला असून, छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यानं सुयशलाही आपलं वेगळं फॅन फॅलोईंग दिलं आहे. अशा दोन कलाकारांची केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. संदिप पाठक, मिलिंद दास्ताने यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हॅशटॅग प्रेम

प्रेमावर आधारलेला प्रत्येक चित्रपट जरी गुलाबी रंगात न्हाऊन प्रेक्षकांसमोर येत असला तरी 'हॅशटॅग प्रेम' या चित्रपटानं आपलं एक वेगळं वैशिष्ट्य जपल्याचं मत दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी व्यक्त केलं आहे. प्रेम हा कधीही न संपणारा विषय आहे. या भावनेला कोणताही कवी, लेखक, दिग्दर्शक शब्दांच्या बंधनात बांधू शकणार नाही. प्रत्येकानं आपापल्या परीनं प्रयत्न करत आपल्या मनातील भाव शब्दांद्वारे व्यक्त केले असतील, पण प्रेम आजही मुक्त आहे.

हॅशटॅग प्रेम

पटकथालेखक निखिल कटारे यांनी 'हॅशटॅग प्रेम'ची कथा-पटकथा लिहिली आहे. सिनेमॅटोग्राफर राजा फडतरे यांची अफलातून कॅमेरावर्क केलं आहे. संजाली रोडे आणि कौतुक शिरोडकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार प्रविण कुवर यांनी संगीत दिलं आहे. गायक-संगीतकार रोहित राऊतनं पार्श्वसंगीताची जबाबदारी सांभाळली आहे. केशव ठाकूर यांनी कला दिग्दर्शन केलं असून, महेश भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.

हॅशटॅग प्रेम

कोरोना आणि लॅाकडाऊनमुळं निर्माण झालेली अडथळ्यांची शर्यत पार करत निर्माते अनिल गोविंद पाटील यांच्या माऊली फिल्म प्रोडक्शन आणि जिसीम्स निर्मित, अर्जुन सिंग बरन, कार्तिक दि. निशाणदार प्रस्तुत तसेच पिकल एन्टरटेन्मेंटच्या समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या सहयोगानं 'हॅशटॅग प्रेम' येत्या १७ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - कन्फर्म!! अखेर कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी घेतले 'सात फेरे'!!

ABOUT THE AUTHOR

...view details