महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दिशा- टायगर ट्रोल, आलिया-रणबीरला प्लाझमा दान करण्याचा नेटकऱ्यांचा सल्ला - टायगर श्रॉफ ट्रोल

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. यामुळे कोट्यवधी लोक संकटात आहेत. मात्र, काही सेलिब्रिटी मालदीवमध्ये जाऊन एन्जॉय करत आहेत. त्याचे फोटोही समोर येत आहेत. यामुळे अभिनेता रणबीर कपूर, त्याची प्रेयसी अभिनेत्री आलिया भट्ट, तसेच अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

Alia
Alia

By

Published : Apr 26, 2021, 1:51 PM IST

हैदराबाद : सुनामी सारख्या भयंकर अशा कोरोना लाटेशी महाराष्ट्र लढा देत आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक 'जनता कर्फ्यू' जाहीर केला आहे. त्यातच कित्येक सेलिब्रिटींनी विदेशी लोकेशन्सवर न जाण्याचे ठरवले. मात्र, अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर आलिशान ठिकाणी सुट्टीला गेल्याचे फोटो पोस्ट केले. यामुळे ते ट्रोल झाले.

सामान्य परिस्थितीत सेलिब्रिटी जेव्हा विदेशी सुट्टीतील फोटो पोस्ट करतात तेव्हा त्यांचे चाहते लाईक करतात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (25 एप्रिल) सांगितले की, कोविड संक्रमणाची दुसरी लाट भारतीयांच्या "सहनशीलतेची आणि वेदना सहन करण्याची क्षमता" याची चाचणी घेत आहे. त्यामुळे देशभरातील नेटीझन्सदेखील सुखदायक चित्रे पाहण्यासाठी धजावत नाहीत.

त्यातच, रविवारी मालदीवच्या सुट्टीनंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुंबईत परतले. शिवाय तेथील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे ते दोघे जोरदार ट्रोल झाले. शिवाय अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा यांनीही मालदीवमध्ये लग्न केले असल्याची चर्चा रंगली. यामुळे नेटकऱ्यांनी या सर्वांना ट्रोल केले. तसेच, आलिया आणि रणबीरने दोघांनीही प्लाझ्मा दान करावा असे नेटकऱ्यांनी सुचवले. कारण, रणबीर- आलिया हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत.

दिशाने इन्स्टाग्राम स्टोरीजवर अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले असताना, रणबीरसोबत क्वालिटी टाईम घालवल्यामुळे आलिया सोशल मीडियावर जास्त दिसली नाही. दरम्यान, जान्हवी कपूर, सारा अली खान, पूजा बेदी यांनीही नुकतेच सोशल मीडियावर सुट्टीचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे त्यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, अभिनेता नवाजऊद्दीन सिद्दीकी, अमित साध, लेखिका शोभा डे आणि सेलिब्रिटी मॅनेजर रोहिणी अय्यर यांनी सुट्टीचे फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटींना फटकारले.

ABOUT THE AUTHOR

...view details